Tue, Jul 23, 2019 06:19होमपेज › Goa › पर्रीकरांनी सांगितले, ते स्कूटर का चालवत नाहीत 

पर्रीकरांनी सांगितले, ते स्कूटर का चालवत नाहीत 

Published On: Jan 14 2018 6:48PM | Last Updated: Jan 14 2018 6:48PM

बुकमार्क करा
पणजी : पुढारी ऑनलाईन

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा थाट काही ओैरच असतो. मुख्यमंत्र्यांसोबत गाड्यांचा ताफा, सुरक्षा रक्षक, त्यांच्या पुढे मागे करणारे लोक असतात. पण, भारतातील एका राज्याचे मुख्यमंत्री मात्र याला अपवाद आहेत. ते म्हणजे, देशाचे माजी सुरक्षामंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर होय. पर्रीकर गोव्यामध्ये त्यांच्या स्कूटरसह फेरफटका मारताना दिसायचे. पण, आता त्यांनी स्कूटर चालवणे बंद केले आहे. पणजीतील एका कार्यक्रमात त्यांना विचारले असता त्यांनी याबद्दलचे कारण सांगितले. 

‘मला अनेक लोक तुम्ही स्कूटर चालवता का असे विचारतात, मी स्कूटर चालवणे बंद का केले अशीही विचारणा होते. माझे डोके सतत कामाच्या विचारात गुंतलेले असते. त्यामुळे मला अपघाताची भिती वाटते. म्हणून मी स्कूटर चालवणे बंद केले आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले. 

अपघात होण्याच्या भीतीने पर्रीकर यांनी स्कूटर चालवणे बंद केले आहे, असे असले तरी त्यांना स्कूटर प्रवासाचा मोह आवरत नाही. म्हणूनच ते मागील सीटवर बसून ‘स्कूटर राईडचा आनंद घेतात.

गोव्यात रोडवर होणारे अपघात टाळण्यासाठी गोवा राज्य सरकारकडून अनेक नवीन साधनांचा, तंत्रांचा वापर करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोहर पर्रीकर स्कूटरवरूनच परिसरातील मार्केटमध्ये खरेदीसाठी जातात अशा चर्चा सुरू होत्या.