Tue, Jul 16, 2019 13:36होमपेज › Goa › अज्ञात व्यक्तिची हाडे आणि कवटी सापडली

अज्ञात व्यक्तिची हाडे आणि कवटी सापडली

Published On: Feb 06 2018 10:44AM | Last Updated: Feb 06 2018 10:44AMमडगाव : प्रतिनिधी

धर्मापूर मडगाव येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला अज्ञात व्यक्तीची कवटी आणी  पायाचे हाड सापडली आहे. हा खुनाचा प्रकार असल्याची चर्चा या भागात सुरू आहे. मडगाव पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंद केले आहे.

सायंकाळी उशिरा धर्मापूर येथे कार्नेरीयो या महिलेच्या दारात एक कवटी आणि पायाचे हाड सपाडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर भाग महामार्गाला लागून आहे. घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक आणि पोलीस पथकासह धर्मापूर येथे जाऊन घटनेचा पंचनामा केला. नायक यांनी हा खुनाचा प्रकार नसल्याचे सांगितले. कुत्र्यांनी ही कवटी आणि पायाची हाडे लोकवस्तीत आणून टाकली असावीत अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.