Thu, Sep 20, 2018 10:13होमपेज › Goa › फोंडा : बिंबल-कुळे येथे अपघातात तरुण ठार

फोंडा : बिंबल-कुळे येथे अपघातात तरुण ठार

Published On: Jan 29 2018 12:28AM | Last Updated: Jan 29 2018 12:24AMफोंडा ः प्रतिनिधी

बिंबल-कुळे येथे रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकीने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बादशाह इब्राहिम मिराडे (वय 29, रा.सांगली, महाराष्ट्र) या दुचाकीस्वाराचा कुडचडे येथील इस्पितळात नेताना मृत्यू झाला. अपघातप्रकरणी ट्रक चालक प्रेमपाल दयाराम तकिया(40, रा.मध्य प्रदेश) याला कुळे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (एमएच-10-सीसी-7144) ही दुचाकी घेऊन बादशाह मिराडे हा सावर्डेहून कुळेच्या दिशेने जात होता.

बिंबल येथे समोरून येणार्‍या (जीए-08-यू-8661)  या ट्रकला दुचाकीची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. कुडचडे येथील इस्पितळात नेत  असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. अपघातप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. निरीक्षक नीलेश धायगोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्वेश सावंत यांनी अपघाताचा पंचनामा केला.