Wed, Jul 24, 2019 07:51होमपेज › Goa › पणजी मार्केटमध्ये बत्ती गूल; विक्रेत्यांना त्रास 

पणजी मार्केटमध्ये बत्ती गूल; विक्रेत्यांना त्रास 

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 14 2018 12:55AMपणजी : प्रतिनिधी

पणजी मार्केट मधील वीज  ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने  गेल्या दोन दिवसांपासून मार्केटमध्ये  अंधार पसरला आहे. बाजारातील वीज पुरवठा ठप्प झाल्याने  विक्रेत्यांबरोबरच  ग्राहकांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरु होते. मार्केटमधील वीजपुरवठा गुरुवारी दुपारी खंडित झाला होता. बत्ती गुल झाल्याने  नव्या मार्केट इमारतीमधील फळ,भाजी,फुल विक्रेते  संध्याकाळच्या वेळी मेणबत्तीच्या उजेडात व्यवहार करताना दिसत होते. काही विक्रेत्यांनी तर वीज नसल्याने  6 वाजताच  आपली दुकाने बंद करुन  घरची वाट धरल्याने संध्याकाळीच्या वेळी  खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना अडचण सहन करावी लागल्याचे दिसून आले.त्यातही जे विक्रेते उशीरा पर्यंत बाजारात होते त्यांच्याकडे   ग्राहक  मेणबत्तीच्या दिव्यात   किंवा   मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सामान खरेदी करताना आढळून आले. 

पणजी मार्केट समितीचे  राजेंद्र धामसकर म्हणाले, पणजी मार्केट मध्ये मागील दोन दिवसां पासून  वीज नसल्याने दुकानदार, विक्रेत्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा ग्राहकांवर देखील  परिणाम होत  आहे. मार्केट मध्ये   वीज आवश्यक असल्याने पुरवठा सुरळीत करावा,अशी मागणीही वीज खात्याकडे  करण्यात आली होती. परंतु  ही समस्या सुटली नाही.