Fri, Feb 22, 2019 09:31होमपेज › Goa › आजपासून गोव्यात इलेक्ट्रिक बस सेवा

आजपासून गोव्यात इलेक्ट्रिक बस सेवा

Published On: Jan 30 2018 1:23AM | Last Updated: Jan 30 2018 1:18AMपणजी : प्रतिनिधी

विजेवर चालणार्‍या (इलेक्ट्रिक) राज्यातील पहिल्या बसच्या सेवेचा प्रारंभ मंगळवारी (दि.30) सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार आहे. या बसमुळे  प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

‘गोल्डस्टोन इन्फ्राटेक लि.’ कंपनीकडून पहिली इलेक्ट्रिक बस या सोहळ्यात ‘कदंब’ला सुपूर्द केली जाणार असून राज्यातील कुठल्या मार्गावर या बसची चाचणी होणार आहे, हे अद्याप निश्‍चित झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या कार्यक्रमात वाहतूक खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर, कदंब परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा कार्लुस आल्मेदा, सांताक्रुजचे आमदार टोनी फर्नांडिस उपस्थित राहणार आहेत.

कुजिरातील विद्यार्थ्यांसाठी कदंबच्या 15 बसेस

कुजिरा संकुलातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरकार 15 नव्या ‘कदंब’ बसेसची सेवा मंगळवारपासून सुरू करणार आहे. धेंपो वाणिज्य महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी 8.30 वाजता मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते या बसेसना हिरवा बावटा दाखवला जाणार आहे.