Thu, Sep 20, 2018 00:57होमपेज › Goa › माजी डीआयजी गर्गविरोधात एफआयआरचा आदेश रद्द

माजी डीआयजी गर्गविरोधात एफआयआरचा आदेश रद्द

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 12:36AMपणजी : प्रतिनिधी  

माजी पोलिस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्या विरोधात  लाच  घेतल्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाला एफआयआर नोंदवण्याचा दिलेला कनिष्ठ न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी रद्द केला. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे गर्ग यांना दिलासा मिळाला आहे.  

कनिष्ठ न्यायालयाच्या  निर्णयाला गर्ग यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वास्को येथील व्यावसायिक मुन्नालाल हलवाई यांनी गर्ग     यांच्याविरोधात लाच घेतल्याची  तक्रार दाखल केली होती. एका प्रकरणात एफआयआर नोंदवण्यासाठी राज्याचे तत्कालीन पोलिस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांनी 2016 साली 5.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप हलवाई यांनी केला होता.

याप्रकरणी त्यांनी गर्ग यांच्याविरोधात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली  होती. मात्र, पोलिसांनी ही तक्रार नोंदवून  न घेतल्याने हलवाई यांनी पणजी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार पणजी न्यायालयाने गर्ग विरोधात  लाचप्रकरणी  एफआयआर नोंद करण्याचे आदेश भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिले होते.मात्र, पणजी  न्यायालयाच्या या आदेशाला गर्ग यांनी  उच्च न्यायालयात  आव्हान दिले होते. गर्ग यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप झाल्यानंतर सरकारने त्यांची गोव्याबाहेर तडकाफडकी बदली केली होती.