Tue, Nov 20, 2018 23:05होमपेज › Goa › गोमंतक धनगर समाजाची पणजीत निदर्शने

गोमंतक धनगर समाजाची पणजीत निदर्शने

Published On: Jul 13 2018 7:41PM | Last Updated: Jul 13 2018 7:41PMपणजी : प्रतिनिधी

कुर्डी सांगे पंचायतीचे सदस्य जानू झोरे यांना सांगे पोलिस स्थानकात केलेल्या मारहाणप्रकरणी पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांना सेवेतून निलंबित करावे, या मागणीसाठी गोमंतक धनगर समाजातर्फे पणजी येथील आझाद मैदानावर निदर्शने करण्यात आली.

गोमंतक धनगर समाजाच्या या आंदोलनाला शिवसेना गोवा राज्य समितीने पाठिंबा दर्शवला. एकोस्कर यांना सेवेतून निलंबित न केल्यास आंदोलन छेडू, असा इशारा समाजाचे सांगे विभागाचे अध्यक्ष बाबू रेकडो यांनी दिला.

कुर्डी सांगेचे पंचायत सदस्य जानू झोरे म्हणाले, की आपल्या भावाविरोधात सांगे पोलिस स्थानकात तक्रार आल्याने त्याची चौकशी करण्यासाठी आपण पोलिस स्थानकात गेलो होतो. त्यावेळी सांगेचेे पोलिस निरीक्षक एकोस्कर यांनी आपल्या भावाला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली. या गोष्टीला आपण विरोध करताच त्यांनी आपल्याला मारहाण करून मोबाईलही फोडला.