Wed, Apr 24, 2019 21:30होमपेज › Goa › आंदोलकांवरील लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करा

आंदोलकांवरील लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करा

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 1:41AMपणजी : प्रतिनिधी

खाण अवलंबितांच्या सोमवारच्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ गटाने केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात उद्भवलेल्या खाणबंदीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस गांभीर्याने विचार करत आहे. यासाठी पक्षाने सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रतापसिंह राणे, नीळकंठ हळर्णकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व विल्फ्रेड डिसा यांचा समावेश आहे.  

याशिवाय, विरोधी आमदारांच्या मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यामध्ये आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, फिलिप नेरी रॉड्रिगीस, विल्फ्रेड डिसा व  दयानंद सोपटे यांचा समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटींची विकासकामे करण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेत विरले असून, राज्यात अनेक ठिकाणी अनावश्यक कामे सुरू असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.