Fri, Jul 19, 2019 20:55होमपेज › Goa › ‘या’ राज्यात देहविक्रीसाठीही आधार सक्तीचे!

‘या’ राज्यात देहविक्रीसाठीही आधार सक्तीचे!

Published On: Dec 17 2017 11:11AM | Last Updated: Dec 17 2017 11:28AM

बुकमार्क करा

पणजी : पुढारी ऑनलाईन 

सरकारने मोबाईल, बँक खाते, सर्व सरकारी योजना, पॅनकार्ड यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. पण, भारतातील गोवा हे एकमेव राज्य असेल जिथे देहविक्री व्यवसायातही आधार कार्ड सक्तीचे आहे. अर्थात ही सक्ती गोवा सरकारने केली नाही. तर गोवा पोलिसांमुळेच या व्यवसायातील लोकांवर ही सक्ती करण्याची वेळ आली आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील काही तरुण आपल्या मित्राच्या बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आले होते. त्यांनी देह विक्री व्यवसायातील एका दलालाशी संपर्क केला. त्या दलालाने त्यांच्याकडे मागणीनुसार तरुणी पाठवण्याचे कबूल केले आणि तो तेथून गेला. थोड्या वेळाने त्याने त्या तरूणांच्या मोबाईलवर संपर्क साधला आणि त्यांच्या आधार कार्डचा फोटो व्हॉट्स ॲप वरुन देण्यास सांगितला. या तरुणांना हे अजब वाटले त्यांनी त्याच्याशी या बाबत हुज्जत घातली. त्यावेळी त्या दलालाने हे त्या तरुणींच्या सुरक्षिततेसाठी हे अनिवार्य आहे, असे सांगितले. 

देह विक्रीसाठी आधार कार्ड मागण्याची ही विचित्र घटना आहे. पण, या मागचे कारणही तसेच आहे. गोवा पोलिस सध्या वेशांतर करुन ग्राहक आहे असे भासवून देह विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकत आहेत. त्यामुळे देह विक्री व्यवसाला मोठा फटका बसत आहे. यासाठी खबरदारी म्हणून हे दलाल ग्राहकाकडून आधार कार्डची मागणी करतात. याचबरोबर ते मोबईल क्रमांकही तपासून त्या ग्राहकाचे मुळ ठिकाण कोणते आहे हे तपासतात. 

यामुळे आता पॅन कार्ड, बँक खाते, मोबाईल सेवा याचबरोबर सेक्स करण्यासाठीही आधार सक्तीचे झाले अशी चर्चा गोव्यात सुरु आहे.