Mon, Nov 19, 2018 04:07होमपेज › Goa › दीनदयाळ उपाध्याय यांचे छायाचित्र हटवा : काँग्रेस

दीनदयाळ उपाध्याय यांचे छायाचित्र हटवा : काँग्रेस

Published On: Feb 03 2018 2:25AM | Last Updated: Feb 03 2018 12:09AMपणजी : प्रतिनिधी

सरकारी खात्यांच्या विविध  अर्जांवर दीनदयाळ उपाध्याय यांचे असलेले छायाचित्र त्वरित काढून टाकण्यात  यावे. उपाध्याय यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला विरोध केला होता, त्यामुळे  सरकारी अर्जांवर त्यांचा  फोटो असणे अयोग्य असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक यांनी पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील 64 कंत्राटी पदांवर केल्या जाणार्‍या नोकरभरतीत  भ्रष्टाचार असून त्याची दक्षता  खात्याने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अ‍ॅड. नाईक म्हणाले,  खाण खाते तसेच अन्य विविध सरकारी खात्यांच्य अर्जांवर दीनदयाळ उपाध्याय यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे. उपाध्याय यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला, लोकशाहीला विरोध केला. अशा व्यक्तीचा फोटो सरकारी अर्जांवर  कशाला हे  मुख्यमंत्री पर्रीकर यांनी  सांगावे. उपाध्याय यांचा फोटो सर्व सरकारी अर्जांवरुन त्वरीत काढून टाकण्यात यावा.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 64 कंत्राटी   पदांसाठीच्या थेट मुलाखतीसाठी  2 हजारांहून अधिक उमेदवार भर उन्हात उभे होते. सदर प्रकार म्हणजे या उमेदवारांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन ठरते. या पदांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार असून दक्षता खात्याने सदर प्रकाराची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.