Tue, Jul 16, 2019 10:19होमपेज › Goa › दाबोळी विमानतळावर 20 लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर 20 लाखांचे सोने जप्त

Published On: Feb 01 2018 1:47AM | Last Updated: Feb 01 2018 1:41AM दाबोळी : प्रतिनिधी

दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकार्‍यांनी बुधवारी एअर इंडियाच्या (एआय-994) विमानातून 19लाख 82 हजार रुपये किंमतीची 720 ग्रॅम वजनाची सोन्याची चार बिस्किटे जप्त केली. 
बुधवारी सकाळी दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या (एआय-994) विमानातील अंतर्गत भागाची तपासणी करताना बेवारस स्थितीत करड्या रंगाची पाकिटे रिकाम्या आसनावर आढळली. कस्टम अधिकार्‍यांनी या संदर्भात प्रवाशांकडे चौकशी केली, मात्र कुणाही प्रवाशाने त्यावर आपला दावा सांगितला नाही.