Sun, Aug 25, 2019 12:19होमपेज › Goa › एनएचएआय अधिकार्‍याविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा नोंद

एनएचएआय अधिकार्‍याविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा नोंद

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 11:51PMपणजी : प्रतिनिधी

सीबीआयने  सुमारे 1.18 मिलीयन डॉलर्सच्या लाच प्रकरणी सीडीएम स्मिथ कंपनीच्या तसेच  भारतीय  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआयए) अधिकार्‍यांविरोधात   गुन्हा नोंद केला आहे. यात  गोव्यातील अधिकार्‍यांना देखील  सीडीएम स्मिथ कंपनीने 25 हजार डॉलर्स लाच दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, सीबीआयने गुन्हा नोंदवल्यानंतर सदर प्रकरणी बंगळूर तसेच चेन्‍नई येथील सीडीएम स्मिथ कंपनीच्या पाच कार्यालयांची तसेच कंपनीच्या तत्कालीन संचालक (वित्त) यांच्या घराचीही झडती घेतली.

अमेरिकास्थित सीडीएम स्मिथ कंपनीने 2011 व 2016 मध्ये देशात विविध ठिकाणी  विकासकामांसंदर्भातील कंत्राट मिळवण्यासाठी  ‘एनएचआयए’च्या अधिकार्‍यांना लाच दिल्याचा आरोप आहे.  गोव्यातदेखील एका जल प्रकल्पाच्या कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी ‘एनएचआयए’च्या अधिकार्‍यांना 25 हजार डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप आहे.  गोव्यातील या लाच प्रकरणाच्या आरोपांची दखल घेत  मुख्य सचिवांना  चौकशी करण्याचे आदेश दिले होते.