Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Goa › किशोरीताई आमोणकर संगीत महोत्सवाची सांगता

किशोरीताई आमोणकर संगीत महोत्सवाची सांगता

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 10:17PMपणजी : प्रतिनिधी

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या स्मरणार्थ कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित संगीत महोत्सवाची सांगता रविवारी घरंदाज गायक पंडीत उल्हास कशाळकर यांच्या गायनाने झाली.  पंडीत कशाळकर यांनी केदार राग सादर केला. त्यांना डॉ. रविंद्र कटोटी यांनी संवादिनीवर, अमर मोपकर यांनी तबल्यावर तर सचिन तेली यांनी तंबोर्‍यावर संगीतसाथ दिली. शिष्य डॉ. शशांक मक्‍तेदार यांची गायन साथ  दिली. 

महोत्सवात  सकाळच्या सत्रात किशोरीताईंच्या शिष्य नंदिनी बेडेकर यांची गायन मैफल रंगली. त्यानंतर शिष्य आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने रसिकांना गायकीचा आनंद दिला. संध्याकाळच्या सत्रात  गोमंतकीय गायक कलाकारांचे गायन झाले. सम्राज्ञी अईर, रुपेश गावस, प्रचला आमोणकर व सचिन तेली यांनी गायनाने मैफलीत रंग भरला. त्यांना अमर पोपकर यांनी तबल्यावर व दत्तराज सुर्लकर यांनी संवादिनी साथ दिली. तसेच अक्षय सावंत व रोहित नाईक यांची तंबोर्‍यावर साथ लाभली. गायिका मंजिरी केळकर यांच्या गायनाची मैफल रंगली. किशोरीताईंचे शिष्यत्व लाभलेल्या केळकर यांनी प्रथम श्री राग गाऊन रसिकांना प्रभावित केले. त्यांना पं. विश्‍वनाथ कान्हेरे यांची संवादिनीवर तर श्रीधर मंडारे यांची तबल्यावर साथ लाभली. 

Tags : Goa, closing, ceremony,  kishori tai amonkar, music, festival