Tue, Apr 23, 2019 02:24होमपेज › Goa › आगोंद बेकायदा बांधकामांकडे सरकारचे दुर्लक्ष

आगोंद बेकायदा बांधकामांकडे सरकारचे दुर्लक्ष

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 11:34PM

बुकमार्क करा

काणकोण : प्रतिनिधी

आगोंद पंचायतीचे काही पंचायत सदस्य बेकायदेशीर बांधकामात गुंतले असून या बांधकामांकडे सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप पंचायतीचे माजी सरपंच बरसात नाईक गावकर यांनी मंगळवारी संध्याकाळी आगोंद येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. बेकायदा बांधकामात गुंतलेला पंचायत सदस्याना अपात्र ठरवावे, यासाठी पंचायत संचालकाकडे केलेल्या तक्रारीवर 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. यापूर्वी   दि.14 नोव्हेंबरला या तक्रारींवर सुनावणी झाली आहे. बेकायदा बांधकामांना पंचायत क्षेत्रात थारा देत नसल्याने पंचायत मंडळाच्या एका गटाने आपल्यावर अविश्‍वास ठराव दाखल करून  सरपंच पदावरून खाली खेचले. मात्र,  यापुढेही पंचायत क्षेत्रात बेकायदा बांधकामांना पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.  पंचायत क्षेत्रात आपले एकही बेकायदेशीर बांधकाम नाही,  असल्यास विरोधकांनी   ते जनतेसमोर आणावे, असे आवाहन त्यांनी  दिले.

 निवासी घर बांधण्याच्या नावावर बेकायदा घरक्रंमाक घेऊन त्याठिकाणी पर्यटन व्यवसायासाठी बांधकामे केली आहेत, असा आरोप त्यांनी केला. गेल्या पर्यटन हंगामात 45 पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटन व्यवसायासाठी अर्ज दाखल केले होते. त्यांच्याकडून पंचायतीने 8 लाख रुपयांचा महसूल नोंदणी प्रक्रिया फी म्हणून जमा केला होता.सरपंचपदावरून उतरण्यापूर्वी 80 पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटन व्यवसायासाठी अर्ज पंचायतीकडे सादर केले आहेत. त्यांच्याकडून 9 लाख रुपयांचा महसूल पंचायतीने जमा केला आहे. दरवषीप्रमाणे सी.आर.झेड. यंत्रणेकडून परवाना मिळेल या आशेवर त्यांनी व्यवसाय सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. आगोंद किनार्‍यावरील दक्षिणेकडील भाग सागरी कासवांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. पर्यटन व्यवसायाचा सागरी कासवांच्या आगमनावर कोणताच परिणाम होत नसल्याचा दावा  नाईक गावकर यांनी केला.