Sat, Apr 20, 2019 23:56होमपेज › Goa › ‘एटीएस’च्या दिमतीला अखेर बुलेटप्रूफ जॅकेट्स

‘एटीएस’च्या दिमतीला अखेर बुलेटप्रूफ जॅकेट्स

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:28AMपणजी: प्रतिनिधी

गोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या दिमतीला अखेर 50 बुलेटप्रूफ जॅकेट  तसेच  50 बुलेटप्रूफ हेल्मेट उपलब्ध झाली असल्याची माहिती पथकाचे पोलिस अधीक्षक  कार्तिक कश्यप यांनी दिली.
दहशतवादविरोधी पथकासाठी  बुलेटप्रूफ जॅकेट  व  बुलेटप्रूफ हेल्मेट खरेदी करावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर  ही  प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याचे  पोलिस अधीक्षक कश्यप यांनी सांगितले. 

दहशतवादविरोधी पथकाचे जलद प्रतिसाद पथकाचे सदस्य  50 बुलेटप्रूफ जॅकेट  व  50 बुलेटप्रूफ हेल्मेटचा वापर करणार आहेत. बुलेटप्रूफ जॅकेट हे एनआयजे 3 या सुरक्षास्तराचे आहेत, तर बुलेटप्रुफ हेल्मेट हे एनआयजे 3 अ या सुरक्षास्तराचे आहेत. 

बुलेटप्रूफ जॅकेट  व  बुलेटप्रूफ हेल्मेट या दोन्हींची तपासणी   गुजरात येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत फॉरेन्सिक  सायन्स  विद्यापीठ गांधीनगर गुजरात येथे करण्यात आली आहे,असेही त्यांनी सांगितले.  

गोवा पोलिसांना या बुलेटप्रूफ जॅकेट चा पुरवठा  दिल्‍लीस्थित कंपनी,  एस.एम.पी.पी प्रा. लि या कंपनीकडून करण्यात आला आहे. तर  तसेच बुलेटप्रुफ हेल्मेटचा पुरवठा   कोलकत्ता येथील  कलकत्ता फॅब्रीकेटर्स या कंपनीने केला आहे. दरम्यान  गोवा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून  30 बुलेटप्रूफ  शिल्ड,2 बुलेप्रुफ  वाहने  तसेच अन्य आवश्यक बुलेटप्रूफ साहित्य   खरेदी करणार  आहेत. यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.