Thu, Apr 25, 2019 16:23होमपेज › Goa › तेरा दुचाकी जळून खाक

तेरा दुचाकी जळून खाक

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 15 2018 11:50PMमडगाव : प्रतिनिधी

खारेबांद येथील किसन गॅरेज आणि टेक्सेरा इमारतीजवळ पार्क केलेल्या एकूण 13 दुचाकी आगीत जळून खाक झाल्या आहेत. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गुरुवारी रात्री दीड वाजता सदर प्रकार घडल्याचा पोलिसांना अंदाज असून सुमारे तीन लाख किमतीच्या दुचाकी आगीत खाक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री खारेबांद येथील किसन गॅरेज येथे पार्क केलेल्या सात दुचाकी तर टेक्सेरा इमारतीजवळ पार्क केलेल्या सहा दुचाकी आगीत भस्मसात झाल्या. जवळ असलेल्या एका चारचाकीलाही आगीची झळ लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी  गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर दुचाक्या दुर्गानंद तळावलीकर, साजिदा शेख, दीपिका शिरोडकर, नगरसेवक मनोज मसुरकर, दशरथ शर्मा, सलीम खान, जाकिया बेगम, हसीन इब्राहिम, आलिंदा रंगो आणि प्रवेश मोरिया यांच्या मालकीच्या होत्या. एका महिन्यांपूर्वी आके येथे असाच प्रकार घडला असता आग दुर्घटना म्हणून प्रकरण नोंद केले होते. मात्र, या प्रकरणी पोलिसांना घटनास्थळी संशयास्पद बाबी सापडल्याने पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.  पुढील तपास पोलिस करीत आहेत.