Sun, Jul 21, 2019 07:51होमपेज › Goa › चोरीप्रकरणी बेळगावच्या युवकाला अटक; ६ लाखांचा ऐवज जप्त

चोरीप्रकरणी बेळगावच्या युवकाला अटक; ६ लाखांचा ऐवज जप्त

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 30 2017 12:21AM

बुकमार्क करा
दाबोळी : वार्ताहर

वास्को रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत  चोरीच्या संशयावरून जयराज पाटील (19, रा. बेळगाव) या युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील  दागिने, 17 हजार 600 रुपये रोकड आणि 18 हजार रुपये किमंतीचे 4 मोबाईल,असा 6 लाख रुपयांचा ऐवज शुक्रवारी हस्तगत केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुपती-वास्को या रेल्वेमधून प्रवास करणार्‍या जयराज पाटील  या युवकाला संशयावरून हटकले असता तो गडबडला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे  तीन सोनसाखळ्या, एक नेकलेस कर्णफुले असे दागिने, 17 हजार 600 रुपये रोकड,2हजार रुपये किंमतीची पॉवर बँक, आणि 18 हजार रुपये किमंतीचे 4 मोबाईल असा ऐवज सापडला. तो रेल्वेतून प्रवास करताना चोर्‍या करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

रेल्वे पोलिसांनी त्याला वास्को पोलिसांच्या हवाली केले असता त्यांनी अटक केली. दरम्यान, रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करून दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी रेल्वे पोलिसांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.