Sun, Nov 18, 2018 11:58होमपेज › Goa › म्हापशात वेश्या दलालासह स्पा मालकिणीला अटक 

म्हापशात वेश्या दलालासह स्पा मालकिणीला अटक 

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:37AMपणजी : प्रतिनिधी

मरड म्हापसा येथील स्पा  ब्युटीपार्लरवर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. कारवाईत तीन मुलींची सुटका करून माता अंबर चौधरी (वय 31, उत्तर प्रदेश) या दलालासह  देबोराह रॉड्रिग्स (45, पर्वरी) या स्पा मालकीणीला अटक केली.

पोलिसांनी सुटका केलेल्या पीडित युवती या मुंबई, झारखंड व बिहार येथील आहे. पीडित युवतींची मेरशी येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.प्राप्‍त माहितीच्या आधारे गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतिश  गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्ता नाईक, पोलिस कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, विनायक सावंत, साईनाथ नाईक, संतकुमार, भिवा पार्सेकर,मंगेश  पाटील  व महिला पोलिस कॉन्स्टेबल दीपिका नाईक व राणी गोजेकर यांनी  सहकार्य केले.