होमपेज › Goa › बैलूरक्रॉस अपघातात गोव्याचे दोघे ठार 

बैलूरक्रॉस अपघातात गोव्याचे दोघे ठार 

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 1:28AMबेळगाव  : प्रतिनिधी

विवाह समारंभाहून गोव्याकडे परतताना खानापूर?गोवा रोडवरील बैलूर क्रॉस येथे झालेल्या  अपघातात महम्मद अन्वर शेख (वय 20), दीपसन बाबूराव सोनी (19, दोघे रा. मुस्लिम वाडा, गोवा) या दोघा युवकांचा मृत्यू  झाला. सदर घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.   

सदर तरुण गोव्याहून बेळगावला एका विवाह समारंभासाठी गेले होते. विवाह समारंभ आटोपून ते गोव्याकडे दुचाकीवरून परतत होते. रात्री  7.30 वा. ते बैलूर क्रॉस येथे आले असता गोव्याकडे जाणार्‍या स्कॉर्पिओ कारने  त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना 10.30 वा. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली आहे. धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओ चालक फरार झाला असून पोलिसांकडून स्कॉर्पिओचा शोध घेण्यात येत आहे.