होमपेज › Goa › हरवळेत कारची झाडाला धडक; महिला जागीच ठार

हरवळेत कारची झाडाला धडक; महिला जागीच ठार

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 05 2018 12:29AMडिचोली :  प्रतिनिधी

साखळी-होंडा मुख्य रस्त्यावरील हरवळे येथील मारुती शोरूमजवळ बुधवारी सकाळी इनोव्हा कारने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रेन्सी बिजो जॉय (38) ही आजोबानगर होंडा येथील महिला जागीच ठार झाली. या अपघातात तिचा पती बिजो जॉय किरकोळ जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इनोव्हा (जीए 04, 4143) कारने बिजो जॉय व त्यांची पत्नी रेन्सी जॉय हे साखळीहून होंडा येथे जात असताना चालक पती बिजो जॉय यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडीची झाडाला धडक बसली. त्यावेळी गाडी रस्त्याबाहेर गेली. या अपघातात पत्नी रेन्सीला गंभीर दुखापत झाल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. पती बिजो जॉय किरकोळ जखमी झाले. त्यांना साखळी इस्पितळात आणले असता तेथील डॉक्टरांनी रेन्सी हिला मृत घोषित केले. 

या प्रकरणी डिचोली पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी पती बिजो जॉय यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. उपनिरीक्षक गोपाळ गावस व हरिष गावस यांनी पंचनामा केला.