Wed, Jul 17, 2019 00:34होमपेज › Goa ›  चर्चविरोधी व्हिडीओप्रकरणी ‘आप’ची अज्ञातांविरुद्ध तक्रार 

 चर्चविरोधी व्हिडीओप्रकरणी ‘आप’ची अज्ञातांविरुद्ध तक्रार 

Published On: Apr 26 2018 2:14AM | Last Updated: Apr 26 2018 2:12AMपणजी : प्रतिनिधी  

चर्चविरोधात  व्हिडीओ प्रसृत करून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आम आदमी पक्षा (आप)ने   पणजी पोलिसस्थानकात   अज्ञातांविरोधात बुधवारी फौजदारी तक्रार  दाखल केल्याची माहिती  ‘आप’ च्या सूत्रांनी दिली. 

‘आप’च्या वतीने  नेते वाल्मीकी नाईक यांनी ही तक्रार दाखल केली आहे.  मागील काही दिवसांपासून  अज्ञातांकडून तयार करण्यात आलेला  चर्चविरोधातील  व्हिडीओ  व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्यातील  जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता आहे.  पोलिसांनी हा व्हिडीओ तयार करणार्‍याला शोधून काढून   त्याच्यावर कठोर कारवाई करावी.  पोर्तुगीज राजवटीत  देखील  गोमंतकीय  शांततेने  व सलोख्याने राहत होते. त्यामुळे  या व्हिडीओ तयार करण्याच्या कृतीचा निषेध असल्याचे नाईक यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.  

Tags : goa, church, aap