Fri, Apr 26, 2019 01:55होमपेज › Goa › परिक्रमा नॉलेज टर्मिनस संस्थेतर्फे १३ पासून ‘झीरो पॉईंट वन’ महोत्सव

परिक्रमा नॉलेज टर्मिनस संस्थेतर्फे १३ पासून ‘झीरो पॉईंट वन’ महोत्सव

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:07AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

परिक्रमा नॉलेज टर्मिनस संस्थेतर्फे दि. 13 व 14 जानेवारी रोजी म्हार्दोळ येथील मैदानावर परिक्रमा ‘झीरो पॉईंट वन’ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 13 रोजी सकाळी 9.30 वाजता महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल, अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

स्थानिकांच्या सहभागासाठी म्हार्दोळ येथे कार्यरत शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जे साहित्य या स्पर्धांतून तयार होईल त्याचे संवर्धन केले जाणार आहे. शाळकरी मुलांसाठी ‘मॅपिंग म्हार्दोळ’ ही स्पर्धा घेण्यात येणार असून या अंतर्गत म्हार्दोळचा नकाशा कलात्मक पध्दतीने तयार करावा लागेल. यासाठी लॅटीट्युट आणि लाँजीट्युट व स्केल काल्पनिक असू शकते, हा नकाशा बोध देणारा असावा. आपण राहतो त्या परिसराला मुले किती ओळखतात व त्यांना तो परिसर किती समजला आहे हे मोकळेपणाने मांडण्यासाठी ही स्पर्धा आहे.

मुलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ‘बदलत्या जगात म्हार्दोळ’ हा निबंधाचा विषय असेल. यात नवीन माहितीचा समावेश असावा. निबंध शब्द मर्यादा 1 हजार इतकी असावी. निबंधाला संदर्भ देणे आवश्यक असून संदर्भासाठी कुणाचीही मुलाखत घेता येईल. कोकणी, मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतून स्पर्धकांना निबंध लिहिण्याची मुभा असेल.

ऐतिहासिक म्हार्दोळ या विषयावर लेख लिहिणे स्पर्धा घेण्यात येईल. यासाठी स्पर्धकांना कला साहित्य, चळवळ, इतिहास, खेळ, शिक्षण व इतर कुठल्याही क्षेत्रात योगदान दिलेल्या म्हार्दोळ येथील प्रसिध्द व्यक्तीवर लेख लिहावा लागेेेल. लेखाची शब्द मर्यादा 1 हजार इतकी असावी. कोकणी, इंग्रजी, मराठी व हिंदी या भाषेतून लेख असावा.

शिक्षकांसाठी ललित निबंध स्पर्धा होईल. यात म्हार्दोळ येथे होणार्‍या जायांच्या पुजेच्या उत्सवावर 1 हजार शब्दांचा ललित निबंध लिहून शिक्षकांनी पाठवावा. दि. 10 जानेवारीपर्यंत स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य आपल्या शाळेत जमा करावे. उशिरा पाठविण्यात आलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही, असे आयोजकांनीकळविले आहे. प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल. बक्षिसे परिक्रमा झीरो पॉईंट वन महोत्सवाच्या उद्घााटन सोहळ्यावेळी प्रदान केली जातील, अशी माहिती संस्थेने दिली  आहे.