Tue, Mar 26, 2019 11:38होमपेज › Goa › अ‍ॅडवेन्त्झ ग्रुपच्या ‘युथ फॉर टुमारो’उपक्रमाची सांगता

अ‍ॅडवेन्त्झ ग्रुपच्या ‘युथ फॉर टुमारो’उपक्रमाची सांगता

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 05 2017 1:48AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

अ‍ॅडवेन्त्झ ग्रुपतर्फे राज्यात आयोजित तीन दिवसीय ‘युथ फॉर टुमारो 2017’ या उपक्रमाची शुक्रवारी सांगता झाली. या उपक्रमात 27 शाळांमधील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, संगीत आणि गायन क्षेत्रांमधील आपले कलागुण सादर केले. 

चेअरमन सरोज कुमार पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली 25 कंपन्यांचा समूह म्हणून कार्यरत असलेल्या अ‍ॅडवेन्त्झ ग्रुपद्वारे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांगता सोहळ्यास कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, शिक्षण संचालक गजानन भट उपस्थित होते. प्रसिध्द संगीतकार, गीतकार आणि गायिका वैशाली सामंत यांच्या मंत्रमुग्ध सादरीकरणाने या उपक्रमाची सांगता झाली.

वैशाली सामंत म्हणाल्या, की स्पर्धेत आपली कला सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पाहताना मला माझ्या विद्यार्थीदशेची आठवण झाली. अ‍ॅडवेन्त्झ झेडएसीएलसारख्या कंपन्या युवा पिढीतील प्रज्ञाशोध घेऊन त्यांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करत आहेत, हा स्तुत्य उपक्रम आहे.

झुआरी अ‍ॅग्रो केमिकल्स लिमिटेडचे सुनील सेठी म्हणाले, विविध भाषा, संस्कृती आणि शाळांमधून एकत्र येत विद्यार्थ्यांनी युथ फॉर टुमारोच्या यंदाच्या उपक्रमाचे यश एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले.