Thu, Aug 22, 2019 10:12होमपेज › Goa › बोरीत युवकांनी पकडला अजगर 

बोरीत युवकांनी पकडला अजगर 

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:47AMबोरी : वार्ताहर

बोरी देऊळवाडा येथील प्रसेनजीत  बोरकर यांच्या निवासस्थानाजवळ एक भला मोठा अजगर पकडण्यात यश आले. स्थानिक युवक स्वप्निल नाईक, विश्‍वास नाईक यांनी मित्रांच्या मदतीने भरवस्तीत आलेला मोठा अजगर बुधवारी शिताफीने पकडला.

स्वप्निल नाईक यांनी यापूर्वीही बोरी व शिरोडा परिसरात छोटे मोठे साप, अजगर इतर सरपटणारे विषारी, बिनविषारी सर्प पकडून  जंगलात सोडले आहेत. सदर अजगराने दीड दोन महिने सर्वत्र हैदोस घालून कोंबड्या, मांजर, छोटे कुत्रे व पाळीव डुक्कराचा फडशा पाडला होता.

येथील स्थानिक  वैद्य गुरुदास नाईक यांच्या दृष्टीस कित्येकदा हा अजगर पडला होता व त्यांनी सर्व रहिवाशांना सांगितले होते. जवळच बँडमिंटन मैदान असून लहान मुलं येथे खेळत असतात. हा अजगर पकडल्याने स्थानिक  रहिवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.