Mon, Aug 19, 2019 05:31होमपेज › Goa › प्रेक्षकांना आपण फसवू शकत नाही : आलिया भट

प्रेक्षकांना आपण फसवू शकत नाही : आलिया भट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

दर्जेदार चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम दाद मिळते. कसलाही चित्रपट करून आपण प्रेक्षकांना फसवू शकत नाही, असे प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिने  सांगितले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित संवाद कार्यक्रमात आलिया बोलत होती.

आपल्याला गंभीर आणि विनोदी दोन्ही भूमिका करायला आवडतात.आपण लहरी आहोत. आपल्याला आपल्यात असलेल्या प्रत्येक रूपाला भेटायचे आहे. आपण कशासाठी बनलो आहोत, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. व्यक्‍तीच्या बाह्य रूपावरून त्याचा स्वभाव कळू शकत नाही, असे आलिया म्हणाली.

‘उडता पंजाब’ चित्रपटाचे चित्रीकरण आपल्यासाठी वेगळा अनुभव होता.‘डियर जिंदगी’ चित्रपटाचे गोव्यात 45 दिवस चित्रीकरण करण्यात आले होते.अभिनेता शाहरूख यांच्याबरोबर केलेल्या चित्रीकरणात आपल्याला खूप मजा आली. गोवा अत्यंत सुंदर पर्यटनस्थळ आहे, असे आलियाने सांगितले. प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा हक्‍क आहे आणि आपल्यालाही त्यावर प्रतिक्रिया व्यक्‍त करायचा अधिकार आहे. आपण माझ्यावर प्रेम केले त्यामुळे आपल्यावरही मी हक्‍काने प्रेम करू शकते, असे ती म्हणाली.