Sun, Jun 16, 2019 12:27
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › ‘स्त्री सखी’ योजनेचा महिला दिनानिमित्त प्रारंभ

‘स्त्री सखी’ योजनेचा महिला दिनानिमित्त प्रारंभ

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 12:02AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील सर्व औद्योगिक आस्थापनांतील आणि हॉटेल व्यवसायातील महिलांना सोयीचे व्हावे म्हणून सरकारतर्फे ‘सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्शन मशिन’ बसवण्याची ‘स्त्री सखी’ योजना खास महिला दिनानिमित्त  गुरुवार, दि. 8 मार्च रोजी  सुरू करण्यात आली.  येत्या दोन वर्षांत राज्यातील सर्व औद्योगिक व हॉटेल व्यवसायात  शंभर टक्के अशी मशिन बसवण्याचे सरकारचे ध्येय आहे, असे कामगार मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. 

आल्तिनो येथील ‘आयटी हब’ कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खंवटे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, देशातील अशा प्रकारची अनोखी व पहिली योजना गोव्यात सुरू केली जाणार आहे. सुमारे 24 ते 36 हजार रुपये किमतीचे ‘सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्शन मशिन’ मोठ्या उद्योग कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत खरेदी करून आपल्या महिला कर्मचार्‍यांसाठी बसवावे. तर लहान व मध्यम उद्योग कंपन्यांना सरकारतर्फे हे मशिन मोफत दिले जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय व महाविद्यालयीन संकुलातही हे मशिन सरकारकडून बसवले जाणार आहे. मात्र, या मशिनच्या देखभालीचा खर्च त्या संस्थेला करावा लागणार आहे.