Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › गोव्यात महिला सुरक्षित : राज्यपाल सिन्हा

गोव्यात महिला सुरक्षित : राज्यपाल सिन्हा

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:18AMपणजी : प्रतिनिधी

गोवा हे पर्यटन स्थळ आहे. पर्यटनामुळे राज्याला महसूल आणि गोमंतकीयांना रोजगार मिळतो. याशिवाय पर्यटनामुळे ड्रग्स, मानवी तस्करी आदी राज्यात आले. या वाईट गोष्टीं संपविण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून गोव्यात महिला सुरक्षित आहेत, असे प्रतिपादन  राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी केले.

गोवा प्राधिकरण मैदान कांपाल येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक सोहळ्यात राज्यपाल सिन्हा बोलत होत्या. राज्यपाल सिन्हा म्हणाल्या, की राज्य सरकार समाजविरोधी आणि गुन्हेगारी गोष्टी नियंत्रित करण्यासाठी सर्वते प्रयत्न करत आहे. राज्याच्या सुरक्षा एजन्सी  दहशदवादाला विरोध करण्यासाठी तयार आहे. समाजविरोधी, समाज घातक गोष्टींचा नायनाट करण्यासाठी गोमंतकीयांनी सरकारला मदत करणे आवश्यक आहे.

स्मार्टसिटी अंतर्गत गोवा पुढील वर्षापर्यंत कचरामुक्त होईल. देशात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. कुपोषण, बेरोजगारी, आदी समस्या आहेत. परंतु गोव्यात महिलांसाठी सुरक्षित वातावरण आहे. सुरक्षितेच्या बाबतीत गोवा हा उच्च स्थानावर आहे. त्यामुळे ही प्रतिष्ठा गोमंतकीयांना राखली पाहिजे. असे आवाहन राज्यपाल  सिन्हा यांनी केले.

ड्रग्स व्यवसायाला आळा घालण्यासाठी मजबूत यंत्रणा तयार करून हा व्यवसाय नष्ट करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. या व्यवसायात असणार्‍या लोकांवर कारवाईचे   सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असे  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी   सांगितले.