Mon, Aug 19, 2019 09:53होमपेज › Goa › प्रत्येकाच्या योगदानातून कचरा समस्या सुटेल : रॉड्रीग्स 

प्रत्येकाच्या योगदानातून कचरा समस्या सुटेल : रॉड्रीग्स 

Published On: Jan 29 2018 12:28AM | Last Updated: Jan 29 2018 12:17AMपर्वरी : वार्ताहर

संपूर्ण गोवा कचरामुक्त करण्याचे ध्येय सरकारने बाळगले आहे.त्यासाठी प्रत्येकाने आपला दृष्टीकोन बदलून या मोहिमेला सहकार्य केले पाहिजे. स्वतःला  शिस्त लावून व्यवस्थित कचर्‍याची विल्हेवाट लावली तर गोवा कचरामुक्त व्हायला वेळ लागणार नाही,असे  प्रतिपादन गोवा कचरा व्यवस्थापन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रीग्स यांनी केले.

पिळर्ण - मार्रा पंचायतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कचरा आणि अंमली पदार्थ संदर्भात जागृतीविषयक खास कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक दिनेश गडेकर,जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक,सरपंच अजय नाईक,सोनाली मालवणकर,करण गोवेकर,संदीप बांदोडकर,संतोष बांदोडकर,ब्रेडा डिसोझा,रोशन नाईक, सौ.गोवेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 गोवा सरकारने कचरा रस्त्यावर फेकणार्‍यांवर  दंड 

ठोठावण्याची तसेच  कारावासाच्या शिक्षेची  सुद्धा तरतूद केली आहे.या प्रजासत्ताक दिनी प्रत्येकाने आपला गाव कचरामुक्त करण्याचा संकल्प केला तर कचर्‍याची समस्या आपोआप सुटणार आहे,असे रॉड्रीग्स सांगितले. 

गोव्यातील तरुण आज मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचे सेवन करताना दिसत आहेत.घरातल्यांकडून सहज मिळणारा पैसा,ताणतणावाचे वातावरण आणि मजा म्हणून आजचा तरुणवर्ग अंमली पदार्थाच्या आहारी जात आहेत.म्हणून आई वडिलांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवण्याची गरज आहेे.असे उपनिरीक्षक दिनेश गडेकर यांनी सांगितले.

  रुपेश नाईक ,विजय शेट्टी यांनी यावेळी आपले विचार मांडले.सरपंच अजय गोवेकर यांनी स्वागत केले .रवींद्र गावकर यांनी सूत्रसंचालन केले तर करिष्मा हरमलकर यांनी आभार मानले.