Tue, Apr 23, 2019 01:34होमपेज › Goa › हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणार : हलवाई 

हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणार : हलवाई 

Published On: Sep 13 2018 1:43AM | Last Updated: Sep 13 2018 12:41AMपणजी : प्रतिनिधी

गोवा पोलिस खात्याचे माजी पोलिस महानिरीक्षक सुनील गर्ग लाचप्रकरणी   एफआयआर नोंद करण्याचे पणजी सत्र न्यायालयाचे आदेश रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात   सर्वोच्च  न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती   तक्रारदार  मुन्‍नालाल हलवाई यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली.

हलवाई म्हणाले, माजी पोलिस महानिरीक्षक गर्ग यांनी एका प्रकरणात एफआयआर  नोंद करण्यासाठी  सुमारे  5 लाख  रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार   याविरोधात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. परंतु पथकाने गर्ग यांच्या विरोधात कारवाई न केल्याने  पणजी सत्र न्यायालयात याचिका  दाखल केली होती. पणजी सत्र न्यायालयाने   यावेळी गर्ग यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिले होते. परंतु  गर्ग यांनी  या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने गर्ग यांची मागणी उचलून धरत पणजी  सत्र न्यायालयाचा आदेश रद्दबादल ठरवला. मात्र, यावेळी उच्च न्यायालयाने   गर्ग यांच्या विरोधातील खटल्यासाठी मंजुरी मिळवण्याकरिता याचिका दाखल करावी, असे निर्देशही  दिले होते.  त्यानुसार आपण सर्वोच्च न्यायालयात सदर याचिका दाखल करणार असे हलवाई यांनी सांगितले.