Tue, Apr 23, 2019 19:40होमपेज › Goa › सचिवालयात वायफाय कार्यान्वित

सचिवालयात वायफाय कार्यान्वित

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:33PMपणजी : प्रतिनिधी

तंत्रज्ञानाचा सहजतेने व वेगाने वापर करता यावा, या उद्देशाने सोमवारी पर्वरी येथे सचिवालयात व मंत्र्यांच्या ब्लॉकमध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते वायफाय सेवेस प्रारंभ करण्यात आला. डिजिटल इंडिया अंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सचिवालयातील कामकाजाची गती वाढविण्यासाठी वायफायची मदत होईल, असे मुख्यमंत्री पर्रीकरांनी सांगितले. वायफाय सेवेच्या प्रारंभप्रसंगी आयटी मंत्री रोहन खंवटे, सचिव अमेय अभ्यंकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

मंत्री खंवटे म्हणाले, की वायफाय सेवा ही आजच्या तंत्रज्ञान युगात खूप महत्त्वाची आहे. सचिवालयात जे मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना भेटायला येतात, त्यांना सादरीकरण करतेवेळी वायफाय इंटरनेट वापरणे सोपे जाईल. 

ही सेवा व्हीव्हीआयपी, सचिवालयातील दुसरे कर्मचारी व अतिथी अशा तीन विभागात देण्यात आली आहे. प्रत्येक विभागातील सेवेत बँडविड्थ चा फरक आहे. व्हीव्हीआयपी वापरकर्त्याला अधिक बँडविथ देण्यात आले आहे. व्हीव्हीआयपीमध्ये सर्व मंत्री व त्यांच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे, त्यांना 100 एमबीपीएस बँडविथ देण्यात आला आहे. अतिथींसाठी 20 एमबीपीएस देण्यात आला आहे.  अतिथींसाठीचा वायफाय ते ओटीपीच्या मदतीने लॉग ऑन करून वापरू शकतात.