Mon, May 20, 2019 08:02होमपेज › Goa › समुद्र खवळलेलाच; सतर्कतेचा इशारा

समुद्र खवळलेलाच; सतर्कतेचा इशारा

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:51AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहणार असून किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस राज्यात कमाल तापमानात वाढ होणार असून उष्मा कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तिसवाडी व मुरगाव तालुक्यातील किनारी भागात 2 ते 2.5 मी. उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने सोमवारी मच्छीमारांनी बोटी समुद्रात उतरवल्या नव्हत्या. समुद्रात रविवारी 5-6 मीटर्स उंच उसळलेल्या लाटांमुळे दक्षिण आणि उत्तर गोव्यातील विविध किनार्‍यांवरील   काही शॅक्सचे नुकसान झाले होते. याच प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, सोमवारी कमाल तापमान 34.3  अंश सेल्सियस आणि किमान तापमान 26.2 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 81 टक्के इतके नोंद झाले. येत्या दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याच्या सूत्रांनी वर्तवली आहे. 

Tags :goa, warning alert, arebic sea