Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Goa › वास्कोत महिलेवर बलात्कार; टॅक्सीचालकाला अटक

वास्कोत महिलेवर बलात्कार; टॅक्सीचालकाला अटक

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 30 2018 12:36AMदाबोळी : प्रतिनिधी

दाबोळी विमानतळाजवळून चालत घराकडे जात असलेल्या एका 20 वर्षीय महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने टॅक्सीचालक रविचंद्र भट (रा.आल्त बोगमाळो) याने अज्ञातस्थळी नेऊन बलात्कार केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी संशयित टॅक्सीचालकाला रात्री उशिरा अटक करण्यात आली.

दरम्यान, संशयिताला शुक्रवारी वास्को प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली. वास्को पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला गुरुवारी संध्याकाळी दाबोळी विमानतळानजीक महामार्गावरून चालत मांगोरहिलच्या दिशेने जात असताना संशयित रविचंद्र भट आपली टॅक्सी घेऊन तिच्याजवळ येऊन थांबला व तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसण्यास सांगितले. त्यावर तिने गाडीत बसण्यास नकार दिला. मात्र, संशयिताने तिला जबरदस्तीने गाडीत ओढून अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर पीडितेला वास्कोत आणून सोडले. पीडित महिलेने वास्को पोलिस स्थानकात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीस अनुसरून पोलिसांनी संशयित रविचंद्र भट याला त्याच्या आल्त बोगमाळो येथील घरी जाऊन ताब्यात घेतले.वास्को पोलिस उपनिरीक्षक नेहांदा तावारीस, पोलिस निरीक्षक नालोस्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.