Thu, Jul 16, 2020 08:16होमपेज › Goa › महापौरपदासाठी विठ्ठल चोपडेकर   

महापौरपदासाठी विठ्ठल चोपडेकर   

Published On: Mar 12 2018 1:04AM | Last Updated: Mar 11 2018 11:46PMपणजी : प्रतिनिधी

पणजी महानगरपालिकेत महपौरपदाचा उमेदवार म्हणून विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदासाठी अस्मिता केरकर यांच्या नावांना माजी आमदार अतानसिओ (बाबूश) मोन्सेरात यांनी मान्यता दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दोनापावला येथील एका तारांकीत हॉटेलात मोन्सेरात यांच्या पंधरा समर्थक नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना यंदा महापौरपदी  पुन्हा निवडून आणले जाणार नसल्याचे मोन्सेरात यांनी याआधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर नगरसेवक उदय मडकईकर यांचे नाव पुढे येत होते. मात्र वैयक्तीक कारणासाठी आपण शर्यतीतून  माघार घेत असल्याचे मडकईकर यांनी सांगितले होते. मोन्सेरात गटाकडून उपमहापौरपदासाठी लता पारेख यांच्या जागी अस्मिता केरकर यांना उमेदवारी देण्याचे आधीच ठरले होते. 

भाजप गटाकडून पुंडलिक राऊत देसाई आणि मिनीन डिक्रुज यांची नावे महापौरपदाच्या शर्यतीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या बुधवारी (दि.14) पणजी मनपाची महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.