Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Goa › शिक्षिकेला महिन्याची कैद; 20 हजार दंड

शिक्षिकेला महिन्याची कैद; 20 हजार दंड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव  ; प्रतिनिधी

बढतीसाठी बनावट गुणपत्रिका सादर केल्या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीश सई प्रभुदेसाई यांनी विद्या शेटकर या  शिक्षिकेला दोषी ठरवून एक महिना कैदेची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला. केपे पोलिसांतर्फे वकील सिदिंयाना सिल्वा यांनी बाजू मांडली. न्यायालयाने संशयिताला भा. दं. सं. 465 (बनावट कागदपत्रे सादर करणे), 471 (बनावट कागदपत्रे अधिकृत म्हणून वापर करणे), 468 (फसवणूक करण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे तयार करणे) व 420 (फसवणूक करणे) या कलमांन्वये दोषी ठरविले. 

या खटल्यात म्हैसूर विद्यापीठाच्या रजिस्ट्रारसह एकूण 7 साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने  नोंदवून घेतली. संशयितांद्वारे म्हैसूर विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका सादर करण्याचा प्रकार 14 जून 2005 ते 4 जुलै 2015 या कालावधीत गुडी पारोडा येथील एका हायस्कूलमध्ये घडला होता. ही शिक्षिका अंडर ग्रॅज्युएट होती. 2010 साली एक शिक्षिका निवृत्त झाल्याने  पदवीधर शिक्षकाचे पद रिकामे झाले होते. या काळात शेटकर हिने म्हैसूर विद्यापीठाची गुणपत्रिका सादर केली होती. या गुणपत्रिकेच्या आधारे वरील शिक्षिकेला पदवीधर शिक्षिकेची वेतनश्रेणी लागू झाली होती. नाईक यांनी सदर तक्रार नोंद केली होती.
 


  •