Sat, Jan 19, 2019 09:35होमपेज › Goa › साखळीत बेकायदा जळाऊ लाकूड घेऊन जाणारे वाहने जप्त

साखळीत बेकायदा जळाऊ लाकूड घेऊन जाणारे वाहने जप्त

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 12 2018 12:34AMकेरी : वार्ताहर

साखळी येथे बेकायदा जळाऊ लाकूड घेऊन जाताना दोन वाहने पकडण्यात आली.वाहन क्र.जी.ए.-01 डब्ल्यू-2255 मध्ये 8.448 घनमीटर जळाऊ लाकूड चणेकर पेट्रोल पंप जवळ सापडले. रमेश भगवान झोरे धनगरवाडी-कुडासे-दोडामार्ग (महाराष्ट्र) हे वाहन चालवित होते. बेकायदा लाकूड वाहतूक केल्याबद्दल भारतीय वन्य कायदा 1927 खाली त्याला अटक करून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
वाहन क्र.एमएच-07/3033 या गाडीत 8.360 घनमीटर जळाऊ लाकूड  भरणे शोरूम जवळ सापडले. बानू धाकू झोरे धनगरवाडी खांडरे  दोडामार्ग (महाराष्ट्र) हा वाहन चालवीत होता. त्यालाही अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली.

दैनंदिन पाहणी करताना ही दोन्ही वाहने सापडली. वन विभागाचे आत्माराम देसाई, फोंडू राणे, रेश्मीन मुळगावकर आणि गिरीश बैलुडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोन्ही वाहने पुढील चौकशीसाठी महादेव नाईक व देविदास खारपालकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. पुढील चौकशी  सुरू आहे.
Tags :Vehicles, seized , connection,  unlawful, firewood ,goa news