होमपेज › Goa › पणजी बाजारात भाज्यांचे दर चढेच...

पणजी बाजारात भाज्यांचे दर चढेच...

Published On: Aug 21 2018 1:35AM | Last Updated: Aug 20 2018 11:52PMपणजी : प्रतिनिधी

पणजी बाजारात भाज्यांची आवक चांगल्या प्रमाणात असली तरी भाज्यांचे दर गेल्या काही आठवड्यांपासून चढेच आहेत. राज्यात भाजी तसेच फळांची  पुरेशी आवक होत आहे. परंतु   किरकोळ विक्रेत्यांकडील भाजीचे दर मात्र कमी होत नसल्याने  ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

पणजी बाजारात कांदा 25 रुपये किलो,   बटाटे 30 रुपये किलो, टोमॅटो  30 रुपये किलो असे दर कायम आहेत. भेंडी 40 रुपये किलो, वांगी 40 रुपये किलो, काकडी 30 रुपये किलो, बीट 40 रुपये किलो, गाजर 60 रुपये किलो, कारले 60 रुपये किलो, चिटकी 40 रुपये किलो या दराने विकली जात आहे. आले 80 रुपये  किलो, लसूण 100 ते 120 रुपये किलो,  शिमला मिरची 60 रुपये किलो,  हिरवी मिरची 60 रुपये किलो,   कोथिंबिर 20 रुपयांना एक जुडी या दरात उपलब्ध आहे. तर कोबी आकाराप्रमाणे 30 ते 40 रुपये, फुलकोबी आकाराप्रमाणे 30 ते 40 रुपये किलो इतका दर आहे.  पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर असून  सध्या सध्या मेथी 10 ते 15  रुपयांना जुडी, लाल भाजी 10 रुपयांना 2  जुड्या, शेपू 20 रुपयांना तीन ते चार जुड्या, पालक 20 ला चार जुड्या  अशा दरात विकली जात आहे.  पावसाळ्याचे दिवस असल्याने पालेभाज्यांचे  उत्पादन  वाढले असून काही भाज्या स्वस्त झाल्या आहेत, असे काही  भाजी विक्रेत्यांनी सांगितले.