Mon, Aug 26, 2019 00:21होमपेज › Goa › वास्कोच्या रोहित क्रिकेटर्सने विजेतेपद पटकावले

वास्कोच्या रोहित क्रिकेटर्सने विजेतेपद पटकावले

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 12 2018 12:58AMम्हापसा  : प्रतिनिधी

मुंबई येथे एस.टी.सी.पी.एल. आयोजित टेनिस बॉल आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद वास्कोच्या रोहित क्रिकेटर्स संघाने पटकाविले. 
विजेत्या संघाला 20 लाख रोख व 18 किलो चांदीचा चषक असे बक्षीस प्राप्त झाले. तर  उपविजेत्या संघाला 10 लाख रोख व चषक असे बक्षीस मिळाले. या स्पर्धेत देशातील 16 संघांनी सहभाग घेतला होता.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत रोहित क्रिकेटर्स संघाने बनखेडी मध्य प्रदेशच्या  आरसीसी संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. रोहित क्रिकेटर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 73 धावा काढल्या. यात मुन्ना शेख याने 22 चेंडूत 32 धावा तसेच रवी, बिलाल, अश्रफ यांच्या खेळीमुळे संघाने समाधानकारक धावसंख्या उभारली. तर आरसीसी बनखेडी संघांला सुगत लाडे याच्या 31 धावांच्या बळावर  फक्‍त 52 धावांवर समाधान मानावे लागले. संघांचे इतर खेळाडू धावसंख्या गाठण्यास अपयशी ठरले. 

रोहित क्रिकेटर्सच्या सद्दाम व विशाल यांनी 3 तर अनिकेत यांनी 1 गडी बाद केला. मुन्ना  शेख व संतोष सिंग यांना मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनास खान तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून बबलू पाटील तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून बिलाल शेख यांना गौरविण्यात आले.संघाचे प्रमुख आग्नेल फनार्ंडिस उर्फ अ‍ॅगी, समीर ठाकूर, लाला यादव, शेख बहादूर यादव व बबन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही कामगिरी केली.विजेत्या संघाच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags : Vasco's, Rohit Cricketers, won  title,goa news