Wed, Aug 21, 2019 15:01होमपेज › Goa › वास्को व्यावसायिकांच्या अपरहणाचा २४ तासांत छडा

वास्को व्यावसायिकांच्या अपरहणाचा २४ तासांत छडा

Published On: Jun 10 2018 12:21AM | Last Updated: Jun 10 2018 12:14AMदाबोळी : प्रतिनिधी

वास्कोतील एका व्यावसायिकाचे 10 लाखांच्या खंडणीसाठी केलेले अपहरण वास्को पोलिसांनी 24 तासांत अपहरण कर्त्यांना गजाआड केले. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 10.15 वा. भवरलाल चौधरी यांनी वास्को पोलिस स्थानकात सागर हार्डवेअर अ‍ॅण्ड प्लाय सेंटर या दुकानाचे मालक हरीष कुमार सोळंकी याला तीन अज्ञात व्यक्तींनी जबरदस्तीने पकडून (जीए-03-एच-4555) या वाहनात डाबून वाहन चिखलीच्या बाजूने गेल्याचे तक्रार दिली. 

सदर तीन व्यक्तींनी हरीष कुमार सोळंकी यांचे अपहरण केल्यानंतर अर्ध्या तासाच्य अंतरात त्याचे भाऊ दुंगाराम सोळंकी याला फोन करून त्याच्याकडे 10 लाखांची खंडणी मागितली नाही तर तुझ्या भावाला जीवे मारू अशी धमकी दिली. त्यानंतर वास्को पोलिसांनी 24 तासांत अपहरणाचा छडा लाऊन आरोपीने वापरलेली इंडिका कार (जीए-03-एच-4555) व त्यांनी वापरलेले मास्क ताब्यात घेतले. पुढील तपास दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक दिनराज गोवेकर, उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रांपोझ करीत आहेत.