Wed, Feb 20, 2019 10:45होमपेज › Goa › वास्को भाजी बाजारात वजनमाप खात्यातर्फे सात जणांवर गुन्हा

वास्को भाजी बाजारात वजनमाप खात्यातर्फे सात जणांवर गुन्हा

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 1:40AMपणजी : प्रतिनिधी

वजन व माप खात्याने   बुधवारी वास्को  भाजी बाजारात केलेल्या कारवाईत अयोग्य वजन काटा वापरल्याप्रकरणी   सात जणांविरोधात गुन्हा नोंद केला.  

याशिवाय  उत्पादन तारखेच्या उल्‍लेखाशिवाय मोबाईल साहित्याची विक्री करीत असल्याप्रकरणी आनंद ट्रेड सेंटरवर कारवाई करून  मोबाईल  अ‍ॅक्सेसरीजचे 500 बॉक्स जप्‍त करण्यात आले. अ‍ॅक्सेसरीजच्या बॉक्सवर  वजन व माप कायद्यानुसार  उत्पादन तारीख, महिना तसेच वर्षाचा  उल्‍लेख असणे आवश्यक असते.परंतु या बॉक्सेसवर ते नमूद  नव्हते.  वजन माप खात्याचे नियंत्रक किरण कोसंबे  यांच्या मार्गदर्शनाखाली खात्याचे  वास्को विभागाचे  निरीक्षक  नितीन पुरुशन,दक्षिण गोवा विभागाचे सहाय्यक नियंत्रक  अरुण पंचवाडकर, रामदास गावडे, पास्कॉल वाझ यांनी ही कारवाई केली. 
 वास्को भाजी बाजारात विक्रेत्यांकडून  भाजी विक्रीसाठी योग्य त्या वजन काटयाचा वापर होत नसल्याचे कारवाई दरम्यान आढळून आले. त्यानुसार संबंधीतांवर  वजन माप कायद्याचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.