Tue, May 21, 2019 00:16होमपेज › Goa › ग्रामीण पर्यटनासाठी विविध उपक्रम : पर्यटन  मंत्री 

ग्रामीण पर्यटनासाठी विविध उपक्रम : पर्यटन  मंत्री 

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 29 2018 11:34PMडिचोली : प्रतिनिधी 

ग्रामीण पर्यटनाला दिशा देण्यासाठी  विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जुनी मंदिरे  व  निसर्गपर्यटनाचा  विकास करून ग्रामीण किनारी व शहरी  पर्यटनाला दिशा देण्याचा ध्यास आपण घेतला आहे. साळ गावाचे निसर्ग वैभव प्रसिद्ध असून येथील भूमिका मंदिर  परिसराचे सुशोभीकरण, विद्युतीकरणासाठी सरकारने तब्बल चार कोटींची तरतूद केली आहे, प्रतिपादन  पर्यटन  मंत्री मनोहर बाबू आजगावकर यांनी केले. डिचोली मतदारसंघातील साळ  गावातील भूमिका मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विशेष विद्युत  रोषणाई  कामाच्या प्रारंभप्रसंगी मंत्री आजगावकर बोलत होते.

व्यासपीठावर आमदार राजेश पाटणेकर, ज़िल्हा पंचायत सदस्य  संजय शेट्ये, सरपंच प्रकाश राऊत ,सगुण  राऊत, लाडू परब, प्रभाकर चारी, प्रमिला चारी, मंडळाचे अभियंता परेरा, अधिकारी देवस्थानचे पदाधिकरी आदी उपस्थित होते. 

मंत्री आजगावकर म्हणाले, की गोवा पर्यटन विकास मंडळाच्यावतीने हा चार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. वर्षभरात साळ मंदिर परिसराचा चेहरा बदलणार आहे.  राज्यात पर्यटनाला खूप वाव असून आज खाणी बंद झाल्याने पर्यटनावर अधिक भर देणे गरजेचे आहे. यासाठी किनारी भागातील पर्यटनाला चालना देताना  अनेक सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. नितळ व शुद्ध पर्यटनाला आमचा पाठिंबा राहिल. ग्रामीण भागातही मोठे वैभव आहे, त्याचा पर्यटनाच्या हेतूने फायदा घेणयासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

मये तलावाचे काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात त्याचे लोकार्पण केले जणार आहे. विकासाला खूप निधी लागतो तो सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री पर्रीकर योग्य पद्धतीने उभा करीत असल्याने अनेक योजना मार्गी  लागत आहेत, असेही ते म्हणाले. ते म्हणाले,की आमदार जनतेची सेवा प्रामाणिकपणे करीत असतो.  त्याविषयी संशय घेणे चुकीचे आहे. राजकीय  नेत्यांनीही आपली नीतिमत्ता व पारदर्शकता सांभाळणे गरजेचे आहे.

आमदार राजेश पाटणेकर यांनी सांगितले, की हा प्रकल्प सुरु व्हावा.  यासाठी अनेकवेळा पाठपुरावा केला. आज मंत्री व मुख्यमंत्री यांनी चार कोटींची तरतूद करून साळ गावाच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. येथील प्रसिद्ध गडेउत्सवासाठी देश विदेशातील पर्यकनासाठी हे मंदिर आकर्षण ठरणार आहे. साळ गावात लवकरच उपवीज केंद्र व दहा एमएलडी जलशुद्धीकर प्रकल्प येत आहे.

संजय शेट्ये यांनी सांगितले, की साळ गावात तब्बल चार कोटींची योजना मंजूर झाली असून या उपक्रमाच्या माध्यमातून विकासाला मोठी चालना लाभणार आहे. सरपंच प्रकाश राऊत यांनी  या प्रकल्पाबद्दल सरकार, मंत्री, आमदार व मुख्यमंत्री यांचे आभार मानले.  वल्लभ साळकर, मेघश्याम राऊत संदीप राऊत, घनश्याम राऊत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.