होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते बालभवनच्या प्रॉमिनेडचे अनावरण

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते बालभवनच्या प्रॉमिनेडचे अनावरण

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:03AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी 

गोवा मुक्तिदिनी बालभवनच्या सुशोभित प्रॉमिनेडचे अनावरण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बालभवनच्या विविध उपक्रमांसाठी प्रॉमिनेडचा वापर करण्याचे आवाहन केले. 

बालभवनच्या अध्यक्ष डॉ.शितल नाईक यांनी या प्रांगणाचे सुशोभिकरण करण्यासाठी राज्य पायाभूत विकास महामंडळाने विशेष सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रॉमिनेडवर विद्यार्थ्यांनी नृत्य व लोकवाद्य वादनाचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्य विभागाच्या प्रशिक्षिक तन्वी बांबोळकर यांनी केले. गार्गी शिलिम खान यांनी आभार मानले. 

यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, सामाजिक कल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, राज्य पायाभूत विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. 

बालभवन मंडळाचे सदस्य हेमांगी गोलतकर, सुधीर मळीक, गुरुदास भोमकर, बालभवनचेे संचालक संतोष आमोणकर, कार्यक्रम समन्वयक शशिकांत पुनाजी यावेळी उपस्थित होते.