Mon, Nov 19, 2018 16:49होमपेज › Goa › केंद्रीय मंत्री गडकरींची आज खाण अवलंबितांशी चर्चा  

केंद्रीय मंत्री गडकरींची आज खाण अवलंबितांशी चर्चा  

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 1:47AMपणजी : प्रतिनिधी

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी रात्री भाजपचे आमदार व मंत्र्यांशी राज्यातील खाणबंदी आणि त्यावरील परिणामाबाबत चर्चा केली. गडकरी मंगळवारी दिवसभर खाण अवलंबित, ट्रक, बार्ज, मशिनरी मालक, खाण कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी  चर्चा करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आलेल्या  खाणबंदीच्या संकटावर गडकरी यशस्वीपणे तोडगा काढतील, असा विश्‍वास  सार्वजनिक बांधकाम मंंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला आहे. 

गडकरी यांचे सोमवारी रात्री उशीरा गोव्यात आगमन झाले. पणजीतील हॉटेल मेरियॉटमध्ये त्यांनी रात्री भाजपच्या आमदार-मंत्र्यांशी तसेच घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून खाणबंदीवरील तोडग्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले. गडकरी मंगळवारी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत सर्व खाण अवलंबितांशी चर्चा करणार आहेत. सरकारमधील घटक पक्ष  मगो आणि गोवा फॉरवर्डचे नेते त्यांना दुपारी 2.30 वाजता भेटणार आहेत. त्यानंतर गडकरी त्रिमंत्री  सल्लागार समितीच्या सदस्यांशी  खास चर्चा करणार आहेत. गडकरी संध्याकाळी 6.30 वा. पत्रकार परिषद घेऊन  चर्चेसंदर्भातील माहिती देतील, असे ढवळीकर यांनी सांगितले.