Wed, Sep 26, 2018 16:08



होमपेज › Goa › केंद्रीय संरक्षणमंत्री सीतारामन यांची गोवा नौदल तळास भेट

केंद्रीय संरक्षणमंत्री सीतारामन यांची गोवा नौदल तळास भेट

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:24AM

बुकमार्क करा




दाबोळी : प्रतिनिधी 

केंद्रीय संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी भारतीय नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांसा याच्या समवेत मंगळवारी सकाळी दाबोळी येथील नौदल हवाई तळास भेट दिली. 

यावेळी नौदलाचे पश्‍चिम नौदल विभागाचे ध्वजाधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीष लुथ्रा व गोवा नौदल विभागाचे ध्वजाधिकारी रिअर अ‍ॅडमिरल पुनित के.बहल यांनी स्वागत केले.  तद्नंतर संरक्षणमंत्री सीतारामन  यांना समुद्रातील समारोहास हजर राहण्यासाठी भारतीय नौदलाच्या युध्दनौकेवर जाण्यासाठी प्रस्थान केले. या दोन दिवसाच्या भेटी दरम्यान संरक्षण मंत्र्यांना भारतीय नौदलाच्या विविध सागरी कवायती विभागाची उड्डाणे आणि त्यांची हवाई कवायती यांचेही प्रदर्शन करण्यात येणार आहे.