Mon, Nov 19, 2018 15:29होमपेज › Goa › बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कवळेकर यांना समन्स

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कवळेकर यांना समन्स

Published On: Feb 05 2018 1:41AM | Last Updated: Feb 05 2018 12:09AMपणजी : प्रतिनिधी

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशीसाठी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (एसीबी) विरोधी पक्ष नेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांना सोमवारी (दि.5) सकाळी 11 वाजता एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

कवळेकर यांनी सुमारे 4.78 कोटी रुपयांची बेहिशेेबी मालमत्ता जमवल्याचे  एसीबीने सप्टेंबर-2017 मध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केले होते. याप्रकरणी कवळेकर यांची पत्नी सावित्री यांचेही नाव गुन्ह्याला पाठीशी घातल्याच्या कारणावरून सदर एफआयआरमध्ये  नोंदले आहे.  कवळेकर यांच्या काही कंपन्यांमध्ये सावित्री या संचालक असल्याचे तपासात उघड झाले आहे. याआधी कवळेकर यांनी गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना केरळ राज्यात बेकायदेशीररित्या मालमत्ता विकत घेतल्याचे एसीबीच्या तपासात 2013 साली उघड झाले होते. कवळेकर हे सुमारे साडेसहा वर्षे महामंडळाचे अध्यक्ष होते, व त्या काळात केरळ राज्यात सुमारे 14 मालमत्ता विकत घेतल्याचा एसीबीने संशय व्यक्‍त केला आहे.