Sat, Mar 23, 2019 02:00होमपेज › Goa › मडकईकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मडकईकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:00AMपणजी : प्रतिनिधी

बनावट राबता दाखल्याप्रकरणी पणजी मनपाचे नगरसेवक उदय मडकईकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पणजी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मात्र, मडकईकर यांना अटक  करायची असल्यास 48 तास अगोदर पोलिसांनी त्यांना कळवावे, असेही  न्यायालयाने म्हटले आहे.

मडकईकर यांनी भाटले येथील त्यांच्या इमारतीला मनपाचे तत्कालीन  आयुक्‍त  मेल्वीन वाझ यांची बनावट  सही करुन राबता दाखला  मिळवल्याच्या तक्रारीवरून  पणजी पोलिसांनी मागील आठवड्यात मडकईकर व  त्यांच्या नातेवाईक गीता मडकईकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर मडकईकर यांनी पणजी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.  पणजी पोलिसांनी या याचिकेच्या सुनावणीवेळी मडकईकर यांच्या अटकेची सध्या गरज नसल्याचे  न्यायालयाला सांगितले. 

बनावट राबता दाखला प्रकरणी मडकईकर यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. दरम्यान,  मडकईकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याला बदनाम करण्यासाठी या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप  त्यांनी केला आहे.