Sat, May 25, 2019 23:24होमपेज › Goa › उदय मडकईकरांची पणजी पोलिसांकडून चौकशी

उदय मडकईकरांची पणजी पोलिसांकडून चौकशी

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 27 2018 12:07AMपणजी : प्रतिनिधी

भाटले येथील इमारतीच्या  बनावट राबता दाखलाप्रकरणी  नगरसेवक उदय मडकईकर यांनी मंगळवारी पणजी पोलिस स्थानकात हजेरी लावली. पोलिस निरीक्षक सिद्धांत  शिरोडकर यांनी त्यांची चौकशी केली.

मडकईकर यांना गरज पडल्यास पुन्हा बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मडकईकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवार, दि. 28  रोजी  होणार आहे.  बनावट राबता दाखलाप्रकरणी पणजी पोलिसांनी मडकईकर व त्यांची नातेवाईक गीता मडकईकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत  मडकईकर यांच्या भाटले येथील इमारत बनावट राबता दाखलाप्रकरणी पणजी मनपा कार्यालयाची दोन वेळा झडती घेतली आहे. कारवाई दरम्यान राबता दाखला रजिस्टर जप्‍त करण्यात आले आहे. 

या प्रकरणी पणजी पोलिसांनी   केलेल्या चौकशीत मनपाच्या तांत्रिक  विभागातील दीपक सातार्डेकर यांनी  आपल्याला काहीच ठाऊक नसल्याचा पवित्रा घेतला आहे. सदर प्रकरण हे 2012 चे असून तत्कालीन मनपा आयुक्‍त मेल्वीन वाझ यांनी मडकईकर यांनी राबता दाखला प्राप्‍त करण्यासाठी आपली बनावट सही केल्याचे पत्र  विद्यमान  आयुक्‍त  अजित रॉय  यांना पाठवले होते. या पत्राच्या पार्श्‍वभूमीवर   मडकईकर यांच्या विरोधात रॉय यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.