म्हापसा : प्रतिनिधी
कोलवाळ हमरस्त्यावर हॉटेल स्पाईसनजीकच्या जंक्शनवर रविवारी दुपारी 3.30 वा. दुचाकी व ट्रक यांची धडक होऊन दुचाकीचालक किथ टेलीस (वय 25) हा जागीच ठार झाला तर मागच्या सीटवर बसलेली रक्षा डांगी (20, रा. गिरी-बार्देश) ही युवती गंभीर जखमी झाल्याने गोमेकॉत उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
किथ टेलीस हा मायणा कुडतरी येथील युवक आपल्या जीए-08-एके-3803 दुचाकीवरून गिरी बार्देश येथील रक्षा डांगी हिला घेऊन जात असताना समोरून येणार्या ट्रकची (क्र. जीए-04-टी-5219) धडक दुचाकीला बसल्याने दुचाकीचालक किथ ठार झाला. म्हापसा पोलिसांनी जखमीला हॉस्पिटलमध्ये पोचवले तर मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत बांबोळीला पाठवला.