Sat, Mar 23, 2019 12:05होमपेज › Goa › बागा, सिकेरी समुद्रात तामिळनाडूचे दोघे बुडाले 

बागा, सिकेरी समुद्रात तामिळनाडूचे दोघे बुडाले 

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:14AMम्हापसा :  प्रतिनिधी 

उसळत्या लाटांचे छायाचित्र घेण्यासाठी शनिवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास किनार्‍यावरून समुद्रात गेलेल्या दिनेशकुमार रंगनाथन (वय 28, रा. तामिळनाडू) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला, तर रविवारी सकाळी 7.30 वा. सिकेरी येथील समुद्रात अशाच घटनेत शशिवासन (32, रा.तामिळनाडू) हा पर्यटक बुडाला. 

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी तामिळनाडूतून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या  आठ  युवकांच्या गटातील तिघे लाटांच्या पार्श्‍वभूमीवर छायाचित्र घेण्यासाठी समुद्राच्या पाण्यात गेले. जोरदार लाट आल्याने त्या तिघांपैकी दिनेशकुमार हा बुडाला. सिकेरी समुद्र किनार्‍यावर तामिळनाडूच्याच  चौघा पर्यटकांचा एक गट पर्यटनासाठी आला होता. रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास चौघेही समुद्रात सेल्फी काढण्यासाठी पाण्यात गेले. मात्र जोरदार लाटांचा अंदाज न आल्याने शशीवासन हा तरुण बुडाला.