Thu, Aug 22, 2019 03:52होमपेज › Goa › वेर्ण्यात दोन कोटींचे एसी, टीव्ही जप्त

वेर्ण्यात दोन कोटींचे एसी, टीव्ही जप्त

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 28 2018 12:24AMपणजी : प्रतिनिधी

वजन व माप खात्याने शुक्रवारी केलेल्या एका मोठ्या कारवाईत  वेर्णा येथील लॉईड कंपनीच्या गोदामावर छापा टाकून  2 कोटी 13 लाख रुपयांचे   300 स्प्लीट एसी व 300 एलईडी टीव्ही जप्‍त केले. त्याचबरोबर मडगाव येथे कारवाई करून नवनीत कंपनीचे 5 लाख रुपयांचे  10 हजार  नोटबुक जप्‍त करण्यात आले आहे.

वजन व माप खात्याचे निरीक्षक विकास कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. खात्याकडून नियमितपणे  साहित्यांची तपासणी केली जाते. वजन व माप नियमांनुसार विक्रीसाठीच्या प्रत्येक साहित्यावर उत्पादनाचा महिना व वर्षाचा उल्‍लेख करणे अनिवार्य  आहे. मात्र, खात्याचे अधिकारी तपासणीसाठी गेले असता वेर्णा येथील लॉईड कंपनीच्या गोदामातील  300 स्प्लीट एसी व 300 एलईडी टीव्हींच्या बॉक्सेसवर उत्पादन महिना व वर्षाचा उल्‍लेख नसल्याने जप्‍तीची कारवाई करण्यात आली. याशिवाय  नवनीत कंपनीच्या नोटबुक्सवरदेखील उत्पादनकालाचा  उल्‍लेख नसल्याने नोटबुक देखील जप्‍त करण्यात आले.

वजनमाप नियमांचे उल्लंघन प्रकरणी केलेल्या या कारवाईत  खात्याचे दक्षिण विभागाचे सहायक नियंत्रक अरुण पंचवाडकर, उत्तर विभागाचे सहाय्यक नियंत्रक प्रसाद शिरोडकर, डिचोलीचे निरीक्षक नितीन पुरुशन व म्हापसा निरीक्षक गुलाम गुलबर्ग, कुडचडे निरीक्षक सुजय राणे, सांगेचे निरीक्षक शुबर्ट डिकॉस्टा  तसेच  सुधीर गावकर, पास्कॉल वाझ, गणपत गावस व गुरुनाथ नाईक  यांचा सहभाग होता. 

Tags : goa news, Two crores,  AC TV, seized, Verna,