Thu, Aug 22, 2019 14:32होमपेज › Goa › 18 वैध लिजातील खाणी सुरू करण्याचे प्रयत्न : मुख्यमंत्री  

18 वैध लिजातील खाणी सुरू करण्याचे प्रयत्न : मुख्यमंत्री  

Published On: May 16 2019 2:04AM | Last Updated: May 16 2019 2:04AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील 18 खनिज लिज 2020 पर्यंत वैध आहेत. या  लिज  पुन्हा  सुरू  करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत  सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यातील 18 खनिज लिज वैध आहेत.   या खाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र त्यांच्याकडे सध्या पर्यावरण दाखला तसेच केंद्राचे आवश्यक असलेले अन्य दाखले नाहीत. राज्य सरकारने त्यांना परवानगी दिल्यानंतर त्यांना  हे परवाने त्यांना घेता येतील असे त्यांनी  सांगितले.

राज्यातील 88 खनिज लीजांचे पर्यावरण दाखल सर्वोच्च न्यायालयने रद्द केले. या लिजांचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र ते  वगळता  राज्यात आणखीन  18 खनिज लीज  आहेत. जे वैध  असून ते सुरु करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी  सांगितले.  

राज्यातील विविध खनिज लीजांच्या बाहेर जो मोठया प्रमाणात खनिज माल डंप स्वरुपात आहे तो सरकारच्या मालकीचा आहे. त्यावर खाण कंपन्यांची कुठलीही मालकी नाही. या कंपन्यांनी डंप ठेवण्यासाठी   बेकायदेशीरपणे जमिनीचा वापर केला त्यासाठी त्यांना सरकारकडे दंड स्वरुपात रक्‍कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार ही रक्‍कम जमा करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी  सांगितले.

कॅसिनो बंद करण्यासंदर्भात विचार
मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो बंद  करण्यासंदर्भातील  प्रस्ताव भाजप पक्षाकडून  आपल्याला सादर करण्यात आला असून त्यावर आपण विचार करणार  असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी नुकतेच भाजपचा कॅसिनोंना विरोध असून   त्यांना मुदतवाढ दिली जाऊ नये असा प्रस्ताव सरकारला पाठवणार असल्याचे विधान केले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही वरील माहिती दिली.